कन्याशाळा २२ ऑक्टोबर १९२२ रोजी करंदीकर वाड्यात सुरु झाली व काही वर्षातच सध्याच्या सात-यातील नामांकित कै.रा.रा.रामचंद्र काळे या वकिलांच्या वाड्यात स्थलांतर झाली. या शाळेने ऑक्टोबर २०२२ मध्ये नुकतेच शताब्दी वर्ष अभिमानाने साजरे केले.
मराठी भाषिक पंधरवडा (व्याख्यान)
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कै. सौ.अ.अ. ढवळे ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग, कन्याशाळा, सातारा. दिनांक –16/02/24
दिनांक 19 जून 2023 रोजी महाकवी कुलगुरू कालिदास दिन साजरा करण्यात आला . यादिवशी कु वेदिका जोशी हिने कालीदासाष्ट्काची माहिती सांगितली व विद्यार्थिनींसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. संस्कृत बाह्य परीक्षेत 13 विद्यार्थीनीना बक्षीसे देण्यात आली.
दिनांक 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या दिवशी योगाचे जीवनातील महत्व समजावून देण्यासाठी विविध योगासने , सूर्यनमस्कार व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
अयन दिनाचे औचित्य साधून मा. प्राचार्या सौ सुरेखाताई दौंडे यांनी अयन दिनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन दिनांक 11 जुलै 2023 आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन सजरा करण्यात आला. यावेळी लोकसंख्या वाढीचा देशाच्या प्रगतीवर व लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी कु श्रावणी घोरपडे हिने माहिती सांगितली.
पर्यावरण संरक्षक मा.डॉ उमेश करंबेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी नी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन परसबागेचे महत्व ,कागद वाचविणे,औषधी वनस्पतींची माहिती सांगितली.
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून जयहिंद फौंडेशन सातारा व कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक राख्या व कारगिल येथील सैनिक बांधवाना शुभेच्छा पत्रे पाठविण्यात आली.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. . All rights reserved
Powered by Sangraha