मराठी भाषिक पंधरवडा (व्याख्यान)

27 Feb 2024 16:43:13
मराठी भाषिक पंधरवडा (व्याख्यान)

marathi rajbhasha  
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण कै सौ. अ. अ. ढवळे ज्युनिअर कॉलेज, व्यवसाय शिक्षण व कन्याशाळा, सातारा येथे गुरुवार ८/०२/२०२४ रोजी मराठी भाषिकपंधरवड्यानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. माननीय प्राचार्या सौ सुरेखाताई दौंडे मॅडम यांनी विद्यार्थीनीना मराठी भाषा जतन व संवर्धन करणे का गरजेचे आहे याची माहिती दिली .
व्याख्यानासाठी आलेल्या पाहुण्या सौ.संध्या बापट यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे . मराठी भाषेचे संस्कार, रूढी , परंपरा सण ,वार , मराठी महिने आणि प्रत्येक सणाचे महत्व सांगितले. तसेचं मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत याचे मागदर्शन विदयार्थिनीना केले.
या कार्यक्रमात शालासमितीचे अध्यक्ष माननीय श्री थोरात सर प्राचार्या सौ. सुरेखाताई दौंडे मॅडम, उपप्राचार्य श्री चव्हाण सर, पर्यवेक्षक श्री काळे सर आणि सर्व शिक्षक उपास्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्या सौ. सुरेखाताई दौंडे मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीमती आगाशे मॅडम यांनी करून दिला . सूत्रसंचालन श्रीमती जाधव मनिषा मॅडम यांनी केले. सौ संगिता हेंद्रे मॅडम यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
Powered By Sangraha 9.0