About Institution

Kanya Shala Satara    31-May-2023
Total Views |

schoolकन्याशाळा २२ ऑक्टोबर १९२२ रोजी करंदीकर वाड्यात सुरु झाली व काही वर्षातच सध्याच्या सात-यातील नामांकित कै.रा.रा.रामचंद्र काळे या वकिलांच्या वाड्यात स्थलांतर झाली. या शाळेने ऑक्टोबर २०२२ मध्ये नुकतेच शताब्दी वर्ष अभिमानाने साजरे केले.
 
शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी च्या अनेक तुकड्या असून या सर्व वर्गांना अध्यापन करणारा अध्यापक वर्ग प्रशिक्षित , सुसंस्कारित व गुणवान आहे. त्यामुळे शाळेत अध्यापनाबरोबर चांगले संस्कार , शिस्त व वेगवेगळे उपक्रम यावर भर दिला जातो. शाळेत NCC , RSP क्रीडा विभाग , संगीत, चित्रकला , संगणक व अन्य विषयांच्या विविध स्पर्धा यामध्ये विद्यार्थिनी हिरीरीने भाग घेतात. माध्यमिक विभागला जोडूनच इयत्ता ११ वी , १२वि कला, वाणिज्य शास्त्र व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम असा उच्च माध्यमिक विभाग आहे. येथील विद्यार्थिनी देखील अभ्यासाबरोबरच दैनंदिन जीवनातील समृद्ध होण्याचे धडे घेत असतात व अनेक व्यवसायात चांगली पदे भूषवण्याचे काम करतात. शाळेला आजपर्यंत अनेक थोर व मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. शाळेबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.