
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कै. सौ.अ.अ. ढवळे ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग, कन्याशाळा, सातारा.
दिनांक –16/02/24
हस्ताक्षर स्पर्धा अहवाल
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कै सौ. अ.अ ढवळे जुनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग कन्याशाळा, सातारा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . त्यापैकी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी हस्ताक्षर स्पर्धा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वाना सहज आत्मसात करता येऊ शकते . याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते. नियमीत सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.
माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमास शाला समितीची अध्यक्ष माननीय श्री. दत्ताजी थोरात सर ,माननीय प्राचार्य सौ सुरेखाताई दौंडे मॅडम, उपप्राचार्य माननीय श्री संताजी चव्हाण सर, पर्यवेक्षक श्री काळे सर व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
हस्ताक्षर स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावी आर्टस, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय शिक्षण विभाग यामधील सर्व विद्यार्थीनिनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.